esakal | पर्यावरण प्रेमींनी केलं निर्णयाचं स्वागत, मुंबईतील कांदळवनांचं कवच वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण प्रेमींनी केलं निर्णयाचं स्वागत, मुंबईतील कांदळवनांचं कवच वाढणार

आरेतील 800 एकर जमिन वनक्षेत्र म्हणून घोषीत केल्यानंतर आता मुंबईत कांदळवन विकसीत कऱण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे

पर्यावरण प्रेमींनी केलं निर्णयाचं स्वागत, मुंबईतील कांदळवनांचं कवच वाढणार

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई, ता. 3 : आरेतील 800 एकर जमिन वनक्षेत्र म्हणून घोषीत केल्यानंतर आता मुंबईत कांदळवन विकसीत कऱण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे. वडाळा आणि दहीसर परिसरातील 10 हेक्टर जागेवर ही कांदळवन विकसीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. पर्यावरण प्रेमींना या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

विक्रोळीमध्ये 10 हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडीसाठी नुकताच सांमजस्य करार करण्यात आला. युनावटेड वेस्टर्न कंपनी व मॅन्ग्रूव्ह फाउंडेशनच्या संयुक्त विद्यामाने हे कांदळवन विकसीत करण्यात येणार असून या लागवडीसाठी 33 लाख रूपये कंपनीकडून तर 4 लाख रूपये मॅन्ग्रूव्ह फाऊंडेशन कडून देण्यात येणार आहेत. 

कांदळवन लागवड तसेच संरक्षणासाठी अधिकृत संकेतस्थळ देखील बनवण्यात आले असून महाराष्ट्र कांदळवन प्रतिष्ठानच्या या संकेतस्थळाचे उद्घाटन नवमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पार पडले. महाराष्ट्र सुरक्षा बलामार्फत कांदळवनाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक देखील नेमण्यात आले आहेत. त्यापैकी कर्तव्यावर असतांना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षारक्षकाला 2 लाख रूपयांची मदत कांदळवन फाऊंडेशनच्या निधीतून देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

सुशांत सिंह केस : "महाराष्ट्राच्या बदनामीचा मोदी सरकारचा कट, सूत्रधारांच्या अटकेसाठी SIT नेमा"

मुंबईतील दहिसर या परिसरात देखील कांदळवन निसर्ग उद्यान नियोजित असून त्याबाबतं सादरीकरण ही यावेळी करण्यात आले. वडाळा येथील नियोजित कांदळवन कक्ष कार्यलय तसेच वन विभागाच्या अधिका-यांसाठी विक्षाम गृह व समिती कक्ष बाबत ही सादरीकरण कऱण्यात कऱण्यात आले. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून त्या ठिकाणच्या पर्यटनाला देखील चालना देण्याची निर्णय़ घेण्यात आला आहे.  याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे डिसेंबर 2020 अखेर पुर्ण करावी, असे निर्देश देखील वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. 

( संपादन - सुमित बागुल )

protection layer of mangrove around mumbai will be protected and conserved