
विरार : शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून शैक्षणिक क्षत्रिय भंडारी समाज असा उल्लेख असताना इतर मागासवर्गीय दाखल्यांसाठी पुराव्यांच्या तगादा लावला जात असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्या संदर्भात शिवसेनेच्या पुढाकाराने वसई तालुका प्रमुख प्रथमेश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी वसई प्रांत कार्यालय येथे ही आंदोलन घेतले. या ठिय्या आंदोलनात खाटीक समाजाचे अध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित राहून भंडारी समाजाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर जिल्हा संघटक किरण चेन्दवणकर उपस्थित होते.