
स्वराज्याशी द्रोह करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्या ओवेसीचा निषेध - एकनाथ शिंदे
डोंबिवली - औरंगजेब (Aurangzeb) हा स्वराज्याचा शत्रू (Enemy) होता, त्याने हिंदूंच्या देवस्थानाची, (Hindu God) मंदिरांची (Temple) नासधूस केली. खरे म्हणजे अशा देशद्रोही ज्यांनी स्वराज्याचा (Swarajya) द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीला ओवेसी (Owaisi) नेते भेट देतात. ओवेसींनी जे केले त्याचा मी निषेध करतो अशी संतप्त प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी डोंबिवलीत व्यक्त केली.
ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रगती कला व वाणिज्य महाविद्यालय डोंबिवली यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे जिल्ह्यातील कीर्तनकार सन्मान सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, गणपत गायकवाड, रविंद्र चव्हाण, ह.भ.प. उद्धव मंडलिक, जगन्नाथ पाटील, दत्तात्रय वझे, संतोष केणे, अशोक महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
एमआयएम नेते ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली.यावर पालकमंत्री शिंदे यांनी वरील संतप्त प्रतिक्रिया दिली. कार्यक्रम दरम्यान खासदार शिंदे यांनी कल्याण शीळ रोडला संत सावळाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. यावर पालकमंत्री शिंदे यांनी पूर्ण प्रक्रियेनुसार ही मागणी तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले, ठाणे जिल्ह्यात उत्तम कीर्तनकार आहेत.
कीर्तनकार होणं सोपं नाही. कीर्तनकार समाज प्रबोधन करीत समजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत. अन्यायाविरोधात कीर्तनाच्या माध्यमातून वार करण्याचं काम वारकरी करत असतात. ठाण्यात वारकरी भवन उभारण्यात आलं आहे. खासदार श्रीकांत यांच्या मागणीनुसार दिवा बेतवडा येथे आगरी कोळी वारकरी भवनसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली तील वारकऱ्यांची संत सावळाराम वारकरी भवन उभारण्याची मागणी आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून घ्या निधी मी देईन असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. शेवटी बोलताना आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर हा सिनेमा पाहावा अस आवाहन वारकऱ्यांना त्यांनी केले. ठाणे जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बाबत एमआयडीसी आणि जलसंपदाच्या मंत्र्यान सोबत बैठक लवकरच घेतली जाईल आणि त्यामधून पाणी प्रश्न सोडवला जाईल अस स्पष्ट केलं.
कार्यक्रमात कल्याण शीळ रोडला संत सावळाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा पालकमंत्री शिंदे यांनी केली. यावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सेनेला टोला हाणत कोणी कितीही काही म्हटले तरी वारकऱ्यांसाठी महामार्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नितीन गडकरी यांनी बांधला आहे असे सांगितले.
Web Title: Protest Of Owaisi Going Tomb Of Aurangzeb Who Betrayed Swarajya Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..