कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार : सी समरी अहवालाविरोधात मूळ तक्रारदाराकडून याचिका

सुनीता महामुणकर
Tuesday, 27 October 2020

या आधी पोलिसांच्या अहवालाला ईडीच्या वतीनेही विरोध करण्यात आला आहे.

मुंबई, ता. 27 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला सी समरी अहवालाविरोधात मूळ तक्रारदाराने सत्र न्यायालयात विरोध याचिका आज दाखल केली.

या आधी पोलिसांच्या अहवालाला ईडीच्या वतीनेही विरोध करण्यात आला आहे. मूळ तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी ऍडव्होकेट सतीश तळेकर यांच्यामार्फत सत्र न्यायालयात मंगळवारी याचिका केली. पोलिस अहवाल आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये विसंगती आहे, त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आज सादर करण्यात आलेल्या याचिकेत केली आहे. 

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; BMC कडून 50 हजार खाटांची तयारी 

संबंधित प्रकरण 1961 पासूनचे असल्याने एवढ्या जुन्या नोंदी आणि पुरावे मिळणे आता शक्य नाही. असे म्हणत पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर अहवाल दाखल केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आजी माजी सर्वच पक्षातील बड्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.

ईडीने केलेल्या अर्जामध्ये पोलिसांच्या अहवालाला विरोध केला जातो. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

protest plea will be filled in the court against closer of maharashtra state cooperative bank


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest plea will be filled in the court against closer of maharashtra state cooperative bank