विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार - सूत्रांची माहिती

सुमित बागुल
Friday, 30 October 2020

येत्या सोमवारी म्हणजेच २ तारखेला ही १२ नावे राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यातील एक वेगळं नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचं असणार आहे.

मुंबई : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुत्या होणे अद्याप बाकी आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला, ज्यावर चर्चा झाल्यानंतर तो मंजूर देखील झाला. यानंतर सर्वात जास्त चर्चा होतेय ती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी.

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी जी नावं सुचवली जाणार आहेत त्यामधील काँग्रेसच्या कोट्यातून उर्मिला यांना निवडलं गेल्याची चर्चा होती. दरम्यान स्वतः उर्मिला यांनी काँग्रेसमधून विधानपरिषद उमेदवारी नाकारल्याचेही सूत्रांकडून समोर आलेलं. सध्या राजकारणात येण्याचा विचार नसल्याचं कारण उर्मिला यांच्याकडून देण्याचं बोललं जातंय. अशात त्यानंतर चर्चा होती ती शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेवर जाण्याची विचारणा केली गेल्याची. स्वतः उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी चर्चा केल्याचेही बोलले जात होते. 

महत्त्वाची बातमी : दिशा सालियान मृत्यूचा CBI मार्फत तपास करा, सुशांतच्या मित्राची मुंबई हायकोर्टात याचिका
 

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला होकार कळवला असल्याची बातमी आता सूत्रांकडून समोर येतेय. शिवसेनेने विधानपरिषदेवर जाण्याबाबत उर्मिला मातोंडकर यांची विचारणा केली होती. ज्याला उर्मिला मातोंडकर यांनी आता होकारार्थी उत्तर दिलेले आहे.   त्यामुळे शिवसेनेकडून जी चार नावं राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यासाठी पाठवली जातील त्यामध्ये उर्मिला मातोंडकर यांचं नाव असणार आहे. 

येत्या सोमवारी म्हणजेच २ तारखेला ही १२ नावे राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यातील एक वेगळं नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचं असणार आहे.

urmila matondkar accepts shivsenas proposal to go on vidhan parishad as governor appointed MLA


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urmila matondkar accepts shivsenas proposal to go on vidhan parishad as governor appointed MLA