
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुण्याहून मुंबईपर्यंत लोटांगण घालत आलेल्या एका आंदोलन कर्त्याला छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोरील रस्त्यावर हृदयविकाराचा झटका आला, त्याच्यावर तात्काळ उपचार केल्याने त्याचा जीव वाचला. मागील दोन दिवसापासून मराठा आंदोलकावर मोफत रुग्णसेवा देणारे आणि उपचार करणारे बॉम्बे हॉस्पिटलचे वैद्यकीय वरिष्ठ अधिकारी व कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप निकम यांनी केलेल्या तातडीच्या उपचारामुळे आंदोलकाचा जीव वाचला.