Mumbai : आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आझाद मैदानात आंदोलक संतप्त

आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबादेवी : परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर आम्ही पगारवाढ करत असल्याचे सांगून संप मागे घेण्याचे आवाहन आज संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना केले असले, तरी ते मागे न हटण्यावर ठाम आहेत. परब यांच्या आवाहनाला संपकऱ्यांनी केराची टोपली दाखवली असून आम्ही पगारवाढीसाठी नाही, तर विलीनीकरणाकरिता संप केला आहे, असे सांगत संताप व्यक्त केला.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आझाद मैदानात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आम्ही विलीनीकरणासाठी शहीद होऊ. विलीनीकरण घेऊनच जाऊ, असा निर्धार एसटी कामगार रामचंद्र मुंडे यांनी व्यक्त केला. आझाद मैदानात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तावर आहेत.

माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आम्ही उद्या पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका मांडू असे म्हटले आहे. समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कामगारांनी आत्महत्या करू नये असे आवाहन केले. दरम्यान, आझाद मैदानात संपकरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आदी घोषणा देत आहेत.

loading image
go to top