

Thane Water supply issue
ठाणे - महापालिकेच्या जलवाहिन्यांतून पाणी मिळत नाही, तरीही पाणीपट्टी भरा आणि दैनंदिन गरजांसाठी टँकरचे पाणी विकत घ्या, त्यातच अनधिकृत नळजोडण्यांच्या नावाखाली कारवाईची टांगती तलवार, दिवा शहरातील साबे परिसरातील नागरिकांची ही कोंडी ठाणे महापालिका प्रशासनाने कधी सोडवणार, असा थेट सवाल प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी महासभेत उपस्थित केला. ‘आधी अधिकृत पाणीपुरवठा सुरू करा, मगच नळजोडण्या तोडण्याची कारवाई करा,’ अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.