esakal | मुंबईच्या गोरेगाव येथे 'पीएसए' ऑक्सिजन निर्मिती प्लांट प्रकल्पाची उभारणी
sakal

बोलून बातमी शोधा

doctors

मुंबईच्या गोरेगाव येथे 'PSA' ऑक्सिजन निर्मिती प्लांट प्रकल्पाची उभारणी

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) सामना करताना ऑक्सिजनची मागणी (Oxygen) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्यसेवा प्रणालीवरील ओझे कमी करण्यासाठी आणि रूग्णांना (Patients) उत्तम उपचार व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी श्री. साई. क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण रूग्णालय गोरेगाव (Goregaon) येथे पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्लांट (Oxygen Plant) प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे  उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच कोविड 19 अॅंटीबॅाडी चाचण्या, (Covid test) आयजीजी, आणि आयजीएम चाचण्यांसह अनेक विशेष चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्या रुग्णालयाने उपलब्ध करुन दिल्या आहेत.  या चाचण्यांचा अहवाल अवघ्या 2 ते 4 तासात उपलब्ध होईल.( PSA Oxygen Plant starts in Goregaon inaugurated by minister jayant patil)

प्राणवायू कसा तयार केला जातो ?

वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फ‍िल्‍टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात.

हेही वाचा: अन् बोलता बोलता पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले...

या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्‍स‍िजन जनरेटर’मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट (Zeolit) या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन अर्थात प्राणवायू हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे संस्थापक संचालक डॉ. सुनील चव्हाण म्हणाले, "रुग्णांच्या देखभालीसाठी 30 खाटांचे रूग्णालय रुग्णसेवेसठी सज्ज झाले आहे. ऑक्सिजनची कमतरता भासु नये यासाठी आम्ही हे O2 जनरेटिंग प्लांट उपलब्ध करुन दिले आहेत जेणेकरुन कोणत्याही रूग्णाला उपचारात अडचण येऊ नये.

loading image