esakal | अन् बोलता बोलता पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले...
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja-Munde-in-Tears

अन् बोलता बोलता पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले...

sakal_logo
By
विराज भागवत

वाचा, कोणत्या कारणामुळे पंकजा झाल्या भावनिक

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet Expansion) नुकताच विस्तार झाला. यामध्ये खासदार प्रितम मुंडे (Dr. Pritam Munde) यांना स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रितम मुंडे या दोघी भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरु होती. यावर भाजपने, मुंडे भगिनी नाराज नाहीत, असं स्पष्ट केलंच होतं. मात्र, आज खुद्द पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं. यावेळी बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावल्याचे दिसून आले. (Pankaja Munde in Tears at Mumbai Press Conference while talking about Pritam Munde Union Cabinet Expansion)

हेही वाचा: प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळात संधी न मिळण्यावर पंकजा म्हणतात...

अन् पंकजा यांचे डोळे पाणावले...

पत्रकारांनी ज्यावेळी विचारलं की प्रितम मुंडे यांना संधी मिळायली हवी होती असं तुम्हाला वाटतं का? त्यावेळी पंकजा म्हणाल्या, "पक्षासाठी पायाला फोड येईपर्यंत आम्ही काम केले आहे. प्रीतम मुंडे या राजकारणात लोकांमधील नकारात्मक विचार शांत करण्यासाठी आल्या. प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांनी पदासाठी कोणाकडे मागणी केली नाही. महाराष्ट्रातील नावे आली की प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांची नावे येतात. प्रीतम मुंडे यांना साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारणात यावं लागलं. पहिली टर्म त्यांना साहेबांच्या कामांमुळे लोकांनी निवडून दिलं पण दुसऱ्या टर्ममध्ये त्या स्वत: केलेल्या कामांमुळे निवडून आल्या." .. 'पायाला फोड आलेले असतानाही मी त्यांचा पक्षासाठी प्रचार केला', हे वाक्य उच्चारत असतानाच पंकजा यांचा आवाज गहिवरला, डोळे पाणावले अन् त्या क्षणभरासाठी थांबल्या. त्यांना पत्रकारांनी विचारताच... 'साहेबांची (गोपीनाथ मुंडेंची आठवण आल्याने असं झालं', असं त्या म्हणाल्या आणि पुढे प्रश्नांची उत्तर द्यायला त्यांनी सुरूवात केली.

हेही वाचा: खडसेंच्या ED चौकशीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा भाजपला इशारा

OBC आरक्षणावर केलं भाष्य...

महाराष्ट्राचा नेता असतो जातीचा नेता नसतो. वंचित असेल त्यांच्यासाठी मी आवाज उठवेन. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, यावर कायम आहे. ओबीसी आरक्षण मिळून देण्यासाठी केंद्राचे चार नेते तयार झाले आहेत.

खडसे यांच्या ईडी चौकशीबद्दल...

ईडी, सीबीआय या मोठ्या यंत्रणा आहेत. त्यात चौकशी झाली तर योग्य न्याय होईल. खडसे यांच्या चौकशीविषयी मी मीडियामध्ये बोलणे चुकीचे आहे. नियमानुसार जे असेल ते होईल.

जुन्या व्हिडीओमध्ये भारती पवार बोलताना प्रीतम मुंडे हसत होत्या, त्यावर काय मत?

भारती पवार चांगल्या नेत्या आहेत. त्यांच्याशी मी स्वत: बोलले आहे. त्यांचे अभिनंदन केले आहे. त्या सभागृहात भाषण करत असतांना मागे एका वेगळ्या गोष्टीवर प्रीतम मुंडे हसत होत्या. त्यांच्यावर हसण्याचे काहीच कारण नाही. इतक्या कोत्या प्रवृत्तीचे आम्ही लोक नाही!!

loading image