Viral Video: मुंबई एसी लोकलच्या महिला डब्यात नग्नवस्थेत चढलेल्या एका मनोरुग्णाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहीती नुसार मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकावरचा हा व्हिडीओ आहे. घाटकोपर स्थानकावर हा मनोरुग्ण नग्नवस्थेत लोकलमध्ये चढला. .सोमवारी दुपारी (१६ डिसेंबर २०२४) रोजी चार वाजून अकरा मिनिटांनी कल्याण एसी लोकल घाटकोपर स्थानकावर आली असतांना एक मनोरुग्ण महिला डब्यात चढला. यावेळी तो नग्न अवस्थेत होता. तो लोकलच्या डब्यात चढताच क्षणी तेथील महिलांनी आरडा ओरड केली. मात्र वाचवायला कोणी आले नाही. . यावेळी प्रसंगावधान दाखवत मोटर मनने लोकल थांबवून ठेवली आणि बाजूच्या डब्यात असलेल्या टीसीने त्या मनोरुग्णाला लोकांच्या बाहेर काढले. सध्या हा व्हिडिओ संपूर्ण मुंबईमध्ये व्हायरल होत असून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. .सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. समजा संबंधित टीसी या ठिकाणी पोहोचू शकले नसते तर काहीही घडू शकले असते. यामुळे मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारचा दुर्दैवी प्रकार घडल्यावरही शासन\ प्रशासन जागा होणार का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.