esakal | बापरे! सायन रुग्णालयातून मनोरुग्णाची उडी, सुदैवाने वाचले प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

psycho patient

बापरे! सायन रुग्णालयातून मनोरुग्णाची उडी, सुदैवाने वाचले प्राण

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील( Lokmanya Tilak Hospital) दुसऱ्या मजल्यावरुन एका मनोरुग्णाने (Psycho patient) उडी घेतल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सुदैवाने हा मनोरुग्ण पहिल्या मजल्यावरील (First Floor) रॅम्पवर पडल्याने त्याचा जीव वाचला. मात्र तो जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ( Psycho patient tried to jump down from sion lokmanya tilak hospital-nss91)

हेही वाचा: शालेय शिक्षण विभागाने 15 टक्के शुल्क कपातीचा निर्णय ग्राह्य धरावा - SC

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील कक्षात या 45 वर्षीय मनोरुग्णावर उपचार सुरु आहेत. शनिवारी सकाळी त्यांने खिडकीतून उडी घेतली. पहिल्या मजल्यावरील रॅम्पवर पडला. हा प्रकार लक्षात आल्यावर कर्तव्यावर असलेले संभाजी मडगे, लक्ष्मण मडगे व सिद्धेश तांबडे या सुरक्षा रक्षकांनी त्याला जखमी अवस्थेत खाली काढले. या रुग्णाला तत्काळ अपघात विभागात दाखल करण्यात आले. या रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला का त्याला रुग्णालयातून पळून जायचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.

loading image
go to top