...अन् धामण साप अडकला बिअरच्या टिन मध्ये | Ptyas Mucosa snake update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ptyas mucosa snake

...अन् धामण साप अडकला बिअरच्या टिन मध्ये

मुंबई : मद्य मिळवण्यासाठी (Alcohol) माणसं काय काय करतात याच्या तर्हेवाईक गोष्टी आपण नेहमीच ऐकतो. मात्र आज चक्क एक साप मद्याच्या वासाने (Alcohol smelling) प्रभावित होऊन बिअरच्या टिन मध्ये (beer bottle) अडकल्याची घटना समोर आलीय. गोरेगावच्या साईबाबा संकुलात हा विचित्र प्रकार घडला. धामण जातीच्या (Ptyas mucosa) बिनविषारी सापाला आजही मोठी परीक्षा द्यावी लागली. या धामण जातीचा साप बियरच्या वासाने आकृष्ट होऊन बियरच्या फेकलेल्या एका टिन जवळ आला.

हेही वाचा: मलिक यांच्या विरोधात वानखेडेंचा पुन्हा हायकार्टोत मानहानीचा दावा

टिनच्या फोडलेल्या छिद्रातून त्याने आपले डोके आत घालून आतील द्रव चाटण्याचा प्रयत्न सुरू केला.या प्रयत्नात त्याचे डोके चक्क बिअरच्या टीनमध्येच अडकले. सापाने टिन मध्ये आपले अडकलेले डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र त्याला ते काही जमले नाही. त्यामुळे त्याची जगण्यासाठीची धडपड सुरू झाली.

सापाच्या धडपडण्यामुळे रिकाम्या टिनचा आवाज आसपासच्या राहिवाशांच्या कानावर गेला. त्यांनी येऊन पाहिले असता धामण साप टिन मध्ये अडकल्याचे पाहिले. त्यांनी या प्रकाराची माहिती सर्पसंस्थेला दिल्यानंतर त्यांचे एक पथक तिथे दाखल झाले. सर्प संस्थेच्या स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न करून सापाचे डोके बाहेर काढण्यात यश मिळवले.

टिन मध्ये डोके अडकल्याने सापाच्या डोक्याला काही किरकोळ जखमा झाल्या होत्या असे स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्लाइल्स एण्ड रिहेबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) या प्राणीप्रेमी संस्थेचे तन्मय जोशी यांनी सांगितले. काही रहिवाश्यानी सापाचा हा कारनामा पाहून बेवडा साप अशी आरोळी ठोकत गोंधळ घातला. त्यामुळे साप अधिक बिथरल्याचे ही जोशी म्हणाले.मात्र काही संवेदनशील राहिवाश्यांच्या मदतीमुळे या सापाची सुटका झाली असुन लोकांनी अशा परिस्थितीत सर्प मित्र संघटनेला संपर्क करून वन्य जीवांना मदत करावी असे संस्थेचे संस्थापक संतोष शिंदे म्हणाले.

loading image
go to top