अविनाश भोसलेंच्या मुलाचा ईडीने जबाब नोंदवला

मनी लाँडरिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
ED
EDFile Photo

मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित यांची सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी चौकशी केली. मनी लाँडरिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. काही दिवसांपूर्वीच ईडीनेने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. (Pune Businessman Avinash Bhosle Son ED Money Laundering Case Enquiry In Mumbai)

विदेशी चलन नियंत्रण कायदा 1999 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. ही मालमत्ता अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी फेमाचं उल्लंघन करत ठेवलेल्या फॉरेन सिक्युरिटीज किंवा मालमत्तेच्या समकक्ष मूल्याच्या रूपात जप्त केले आहेत. यामध्ये भारताबाहेर असणारी फॉरेन सिक्युरिटीज किंवा स्थावर मालमत्ता जप्त केली जाऊ शकते.

ED
निर्देशानुसार सुरू झालेली चौकशी; राजकीय हेतूने नव्हे : फडणवीस

आता अविनाश भोसले यांची ‘एबीआयएल’ या रिअल इस्टेट कंपनीने नोकरदारांच्या घरांच्या बांधकामासाठी राखीव असलेला भूखंड खरेदी करुन त्यावर व्यावसायिक इमारत बांधून त्याची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन ईडीने नव्याने गुन्हा दाखल करुन ही चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी अमित भोसले यांचा 6 तास जबाब नोंदवण्यात आला. त्यांना शनिवारी पुन्हा ईडी कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ED
मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होणार ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com