

Avinash Bhosale
ESakal
मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संस्थांवर झालेली ईडीची कारवाई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २१) रद्द केली. या कारवाईअंतर्गत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची २५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. संबंधित आर्थिक व्यवहार आणि गुन्ह्यातील कथित रक्कम यांचा थेट संबंध स्थापित करण्यात ईडी अपयशी ठरल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदवले.