
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि शिंदे गटातील रामदास कदम यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. राजकीय वाद आता घरापर्यंत पोहोचला आहे. योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे. तसेच रामदास कदम यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.