esakal | पुणे-मुंबई इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बस सेवेत दाखल | Electric Bus
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Bus

पुणे-मुंबई इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बस सेवेत दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सुरत, सिल्वासा, गोवा, देहरादूनसह अनेक शहरांमध्ये यशस्वीरित्या ई-बस सेवेनंतर आता इव्हेट्रान्स कंपनीची इलेक्ट्रिक बस (electric bus) पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (pune-mumbai highway) बुधवार पासून पुणे ते मुंबई दरम्यान पुरी बस नावाने आंतर-शहर बस सेवा सुरू केली आहे. आंतर-शहर सेवा भारतात प्रथमच (first in india) सुरू करण्यात आली असून, 15 ऑक्टोबर विजयादशमीच्या (dassehra) शुभ मुहूर्तापासून बसच्या नियमीत प्रवासफेऱ्या (Bus trips) सुरू केल्या जाणार आहे. इव्हे ट्रान्सद्वारे सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक प्रवासाचे (luxurious bus) स्वप्न आता वास्तवात करता येणार आहे.

हेही वाचा: पनवेल पालिकेची मतदार साक्षरता आणि उत्सव; निवडणूक सहभाग मोहीम सुरू

भारत सरकार एफएएमई 1 आणि एफएएमई 2 धोरणातंर्गत दोन शहरादरम्यानच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक बसचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्या जात आहे. ई व्हे ट्रान्सचे महाव्यवस्थापक संदीप रायजादा यांनी पुरीबसच्या फायद्यांचा उल्लेख करताना सांगितले की, भारतामध्ये आंतर-शहर ई-बस सेवा सुरू करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पुरीबस 350 किमी पर्यंत प्रवास एका चार्ज मध्ये करू शकते. दीर्घकाळ खर्चात बचत होत असल्याने इ-बसचा शून्य-उत्सर्जनासह अतिशय किफायतशीर आंतर-शहर प्रवास ऑपरेटरच्या व्यवसायासाठी उत्तम पर्याय निर्माण करून दिला आहे.

शून्य-उत्सर्जन, इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बसमध्ये चालक वाहकासह 45 आसने राहणार आहे. मन प्रसन्न करणाऱ्या आकर्षक रंगसंगतीने बसची सजावट करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या एसी ई-बसमध्ये आरामदायक पुश बॅक सीट आहेत. वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. प्रत्येक सीट जवळ एक इन-बिल्ट यूएसबी चार्जर आहे. पाच क्यूबिक मीटर सामान राहू शकेल एवढी डीकी या बसला देण्यात आली आहे.

डिझेल बसच्या तुलनेत कमी देखभाल आणि प्रती किमी कमी खर्चामुळे पुरीबस आंतर-शहर बस ऑपरेटर्सना चांगला आर्थिक परतावा देते. लिऑन फॉस्फेट बॅटरी ई-बसला उर्जा पुरवते. ट्रॅफिक आणि प्रवासी भार यांच्या भारांकानूसार एका चांर्जीगवर बस 350 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. भारतात ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या बस तयार करते. बसमध्ये अनेक सुरक्षा प्रणाली आहेत. बसमध्ये संकट समयी उपयोगात येणारे पॅनीक अलार्म सिस्टम आणि आपत्कालीन प्रकाश इत्यादींची व्यवस्था केली आहे.

loading image
go to top