esakal | पनवेल पालिकेची मतदार साक्षरता आणि उत्सव; निवडणूक सहभाग मोहीम सुरू | Panvel municipal corporation
sakal

बोलून बातमी शोधा

election literacy

पनवेल पालिकेची मतदार साक्षरता आणि उत्सव; निवडणूक सहभाग मोहीम सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणूक (panvel municipal corporation) विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी (people awareness) विविध कार्यक्रम व स्पर्धांचे, स्विप-२०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. मतदार साक्षरता (voters literacy), नोंदणी आणि निवडणुकीत सहभाग (election participation) ही मोहीम राबवण्यात येत आहे. मोहिमेत पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी व १८ वर्षे पूर्ण झालेल्या नव युवकांनी स्वतःच नाव मतदार यादीत नोंदणी (voters list registration) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: 'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'

नव मतदार नोंदणी आणि निवडणुकीत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा म्हणून परिसरात जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्र व सामाजिक संदेश देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. यामध्ये ऑनलाईन चर्चासत्र व स्पर्धा, उद्योजकासाठी सोशल मीडिया अद्वितीय डिझाईन्स स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, जिंगल्स रील बनविणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पनवेल महापालिका क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था, बचतगट, व्यावसायिक गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सक्रिय सभासदांसाठी तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात एक दिवसीय मतदार नोंदणी कॅम्प आयोजनही करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: बेलापूर रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकाला गंडा

प्रत्येक घराघरात जनजागृती करणे असे उपक्रमही राबवण्यात येणार आहेत. हौशी व व्यावसायिक ग्राफिक्स डिझायर्न्सना वाव देण्यासाठी विविध सोशल मीडिया डिझाईन्स किंवा व्हिडिओ बनवून जनजागृती व्हावी म्हणून ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्‍पर्धेतून पहिल्या ३ विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल तसेच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

"निवडणूक प्रक्रियेमध्ये तरुणांचा व नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने पालिकेच्या निवडणूक विभागामार्फत स्पर्धा व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातून मतदान जनजागृती होणार असून लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने पालिका प्रयत्न करणार आहे. स्पर्धांमधील सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे."
- विठ्ठल डाके, उपायुक्त, निवडणूक विभाग, पनवेल महापालिका

loading image
go to top