
मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसला तळेगाव (दाभाडे) रेल्वेस्थानकावर (दोन्ही वेळेला) थांबा द्या, अशी मागणी करणारी याचिका पुणे प्रवासी संघाने (पीपीएस) उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी पार पडली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन सुनावणी ८ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.