
Mumbai:सायन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्याचा त्रास स्थानिकच नाही तर सर्वच प्रवासी नोकरदार आणि शालेय मुलांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा, अशी मागणी करीत कॉँग्रेस मुंबईच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (ता. २५) सायन रेल्वे स्थानकाबाहेर पुलाच्या रेंगाळलेल्या कामाच्या निषेधार्थ आंदोलन केले.
...अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
सायन पुलाचे काम वेगाने मार्गी लावा, या मागणीसाठी मुंबई काँग्रेसने खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सायन रेल्वे स्थानकाबाहेर सरकारच्या उदासीनतेचा निषेध करीत जोरदार आंदोलन केले व रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सायन पुलाच्या संथगती कामाचा फटका स्थानिकांना तसेच मुंबईकरांना बसत आहे. दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना जीव मुठीत धरून धोकादायक पदपथावरून ये-जा करावी लागत आहे.