Farmer Loan Waiver Scheme
esakal
ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १२ हजारांहून अधिक शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सहा हजार ९२२, तर पालघरमधील पाच हजार ६५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विविध शाखांमध्ये ही रक्कम अदा करण्यात आली असून खातेदारांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.