नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

कल्याणच्या एका माजी नगरसेवकाने २४ तासांत दोन पक्ष बदलल्याचं समोर आलं आहे.
shivsena
shivsena

मुंबई- कल्याणच्या एका माजी नगरसेवकाने २४ तासांत दोन पक्ष बदलल्याचं समोर आलं आहे. माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी दिवसभरात दोनदा पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी काही तासांमध्येच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. सदर प्रकाराची राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.

पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितलं की, 'मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कामासाठी गेलो होतो. पण, त्यांनी माझा पक्षप्रवेश करवून घेतला.' एका दिवसात दोनदा पक्षप्रवेश करणाऱ्या चव्हाण यांनी चर्चा मात्र जोरदार सुरु झाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

shivsena
Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितलं की, मी वैयक्तिक कामासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी गेलो होतो. पण, त्यांनी माझ्या हातात झेंडा दिला. मी गेलो त्यावेळी डोंबिवलीतील काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सुरु होता. त्यावेळी माझ्याही हातात झेंडा देत त्यांनी पक्षप्रवेश करुन घेतला. मला त्यावेळी काहीही कळालं नाही. माझे शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा त्यांनी खूप मदत केली होती.

पुरुषोत्तम चव्हाण यांच्या घरवापसीनंतर ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुले पळवणाऱ्या टोळीसारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळवणारी टोळी सध्या कल्याणमध्ये सक्रिय दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सावध राहावे, असं ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर म्हणाल्या आहेत. दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. त्यांचा सामना शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे.

shivsena
Ravindra Waikar: ईडी कारवाई, शिंदे गटात प्रवेश अन् आता लोकसभा उमेदवारी... जाणून घ्या कोण आहेत रवींद्र वायकर

शिंदे गटाने यावर म्हटलंय की, 'पुरुषोत्तम चव्हाण यांनी स्वताच्या मर्जीने शिंदे गटात प्रवेश केला होता. पण, ते आता नाकारत आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक हे आरोप केले आहेत. एक पुरुषोत्तम चव्हाण गेल्याने काय फरक पडत नाही.' दरम्यान, सदर घटनेमुळे राजकारणात आणखी एक इंटरेस्टिंग किस्सा ऐकायला मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com