मुंबई-पुणे इंटरसिटीला पूश-पूल इंजिन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

मध्य रेल्वेवर शुक्रवारी (ता.24) इंटरसिटी एक्‍स्प्रेसला पूश अँड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अंतिम निर्णयासाठी पुणे विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. या गाडीची देखभाल पुण्यात केली जात असून, तिला "एलएचबी'चे डबे आहेत.

मुंबई - पूश-पूल इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याने मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा वेग वाढून प्रवासाच्या वेळेत 35 मिनिटे बचत होणार आहे.

मध्य रेल्वेवर शुक्रवारी (ता.24) इंटरसिटी एक्‍स्प्रेसला पूश अँड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अंतिम निर्णयासाठी पुणे विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. या गाडीची देखभाल पुण्यात केली जात असून, तिला "एलएचबी'चे डबे आहेत. इंटरसिटी एक्‍स्प्रेस मुंबईहून सकाळी 6.40 वाजता सुटते, ती पुण्याला सकाळी 9.57 वाजता पोहोचते; तर पुण्याहून सायंकाळी 5.55 सुटून मुंबईला रात्री 9.05 वाजता पोचते.

मुंबई ते पुणे 192 किलोमीटरचे अंतर आहे. इंटरसिटी एक्‍स्प्रेसला हे अंतर कापण्यासाठी तब्बल 3 तास 10 मिनिटांचा कालावधी लागतो. कर्जत घाटात सेक्‍शन असल्यामुळे बॅंकर (मागे इंजिन) जोडणे आणि काढणे यासाठी अतिरिक्त वेळ लागतो. आता पूश-पूल इंजिनामुळे या गाडीला या प्रवासासाठी 2 तास 35 मिनिटे लागणार आहे. यामुळे इंटरसिटी एक्‍स्सच्या वेळेत 35 मिनिटांची बचत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: push pull railway engine Mumbai Pune Intercity Express