esakal | मध्य रेल्वे मार्गावर अखेर QR कोड स्कॅनिंग सुरू; 1 लाख 80 हजार 400 प्रवाशांना QR कोड वितरीत
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वे मार्गावर अखेर QR कोड स्कॅनिंग सुरू; 1 लाख 80 हजार 400 प्रवाशांना QR कोड वितरीत

1 लाख 54 हजार 100 प्रवाशांचा क्युआरकोड विना प्रवास

मध्य रेल्वे मार्गावर अखेर QR कोड स्कॅनिंग सुरू; 1 लाख 80 हजार 400 प्रवाशांना QR कोड वितरीत

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर दैनंदिन सुमारे 3 लाख 34 हजार 500 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारने 95 आस्थापनांची यादी मध्य रेल्वेला दिली असून, गुरूवारपासून या कर्मचाऱ्यांसाठी क्युआरकोडची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये सुमारे 1 लाख 80 हजार 400 प्रवाशांना क्युआरकोड वितरीत करण्यात आले असून, दिड लाख कर्मचाऱ्यांचे फोटो अपलोड केले नसल्याने त्यांचा क्युआरकोडविनाच प्रवास सुरू आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य आणि केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलची सेवा सुरू केली आहे. त्यामध्ये सुरूवातीला मध्य रेल्वे मार्गावर 200 लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या त्यापैकी 130 मुख्य मार्गावर तर 70 फेऱ्या हार्बर रेल्वे मार्गावर सोडण्यात आल्या. मात्र, कर्मचाऱ्यांची गर्दी लक्षात घेता पुन्हा 150 फेऱ्यांची वाढ करण्यात आल्यानंतर आता, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर एकूण 350 फेऱ्या धावत आहे. 

मोठी बातमी : मुंबई पोलिसांची 'दिशा' कोणी बदलली? सुशांतसिंह प्रकरणी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्या नेत्यावर गंभीर टीका

या एकूण फेऱ्यांमधून राज्य सरकारने अधिकृत करून दिलेल्या 95 आस्थापनातील तब्बल 3 लाख 34 हजार 500 प्रवाशांचा प्रवास सुरू आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना आपले ओळख पत्र दाखवून प्रवास करता येतो. मात्र, यादरम्यान बनावट ओळख पत्र तयार करून गैरमार्गांने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने, आता क्युआरकोड स्कॅन करूनच कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. 

CSMT स्थानकावर स्कॅनिंग मशिन : 

मध्य रेल्वेने सध्या CSMT रेल्वे स्थानकावर QR कोड स्कॅनिंग मशिन सुरू केली आहे. त्यानंतर दादर, ठाणे, कुर्ला, कल्याण, घाटकोपर, डोंबीवली, पनवेल अशा महत्वांच्या स्थानकांवर या मशिन्स लावण्यात येणार असून, जीआरपी, आरपीएफ आणि तिकीट तपासणीकांचे 495 आयडी तयार करण्यात आले असून, मोबाईल ऍपद्वारे सुद्धा क्युआरकोड तपासले जाणार आहे.

मोठी बातमी : मध्य रेल्वेकडून मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबत आली महत्त्वाची बातमी

दिड लाख कर्मचारी क्युआरकोड विनाच: 

राज्य सरकार, महानगरपालिका आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एकूण 95 आस्थापनामधून तब्बल 3 लाख 34 हजार 500 कर्मचाऱ्यांची नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी फक्त 1 लाख 80 हजार 400 कर्मचाऱ्यांनाच क्युआरकोड दिले असून, इतर तब्बल दिड लाख कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत फोटोच अपलोड केले नसल्याने, या कर्मचाऱ्यांना क्युआरकोड विनाच प्रवास करावा लागतो आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

QR code scanning starts at CSMT station more thane one lac users are using QR

loading image
go to top