रस्त्याच्या वादातून सेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; मानपाडा पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल

शर्मिला वाळुंज
Friday, 13 November 2020

डोंबिवलीतील भोपर गावात रस्ता अडवल्याच्या वादातून शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी (ता. 12) रात्री हाणामारीची घटना घडली.

ठाणे : डोंबिवलीतील भोपर गावात रस्ता अडवल्याच्या वादातून शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी (ता. 12) रात्री हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा - दिवाळी खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठी गर्दी; नागरिकांनी सोडली कोरोनाची भीती

मिळालेल्या माहितीनुसार भोपर गावातील मौर्या चाळीकडे जाणारा कच्चा रस्ता भाजप पदाधिकारी संदीप माळी यांनी बंद केला आहे. येथील चाळींना टॅंकरने पाणीपुरवठा होत असून याच रस्त्याने पाण्याचा टॅंकर येतो. या ठिकाणी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने चाळीतील नागरिकांना पाणी मिळत नाही. या कारणावरून शिवसेना शाखाप्रमुख नितीन माळी यांनी संदीप माळी यांना रस्ता बंद का केला, अशी फोनवर विचारणा केली. या गोष्टीचा राग धरून गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या दरम्यान संदीप हे त्यांचे नातेवाईक कुंदन, मुकेश व आकाश माळी यांच्यासह नितीन माळी यांच्या कार्यालयाजवळ आले. 

हेही वाचा - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झवेरी बाजारात सुवर्णतेजी! कोरोनातही सुवर्ण खरेदी जोरात

जाब विचारल्याच्या रागात संदीप यांनी त्यांच्या हातातील तलवारीने नितीन यांच्यावर वार केले. तसेच कुंदन व आकाश यांनीही नितीन यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. ही घटना समजताच नितीन यांचे नातेवाईक सुभाष, अरविंद व भानुदास यांनी संदीप यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. याप्रकरणी नितीन यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत संदीप, कुंदन, आकाश, मुकेश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, संदीप यांच्या पत्नी प्रिया माळी यांनीही नितीन, भानुदास, सुभाष व अरविंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. मानपाडा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत. 

Quarrel between Sena BJP over road dispute Conflicting cases filed with Manpada police

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarrel between Sena BJP over road dispute Conflicting cases filed with Manpada police