esakal | 'शापा'च्या भीतीने विवाहेच्छुक तरुण सोडताहेत गाव! 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गोव्यातील चंदोर गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धाचा प्रभाव 

'शापा'च्या भीतीने विवाहेच्छुक तरुण सोडताहेत गाव! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मडगाव : गोव्यातील मडगाव नजीक असलेल्या चंदोर गावात प्राचीन काळातील एका राणीने दिलेला शाप सध्या विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी मोठी समस्या बनला आहे. या शापामुळे गावात लग्न करुन आलेल्या विवाहितेच्या पतीचा मृत्यू होतो अशा अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली येथील नागरिक आहेत. त्यामुळे विवाह करुन अनेक तरुणांना विस्थापित होऊन आपल्या आई-वडिलांपासून दूर गावाबाहेर संसार थाटावा लागत आहे.

पुराण व लोककथांमधील उल्लेखानुसार गोव्यातील चंदोर गावात आजही प्राचीन काळातील राणीने दिलेल्या शापाचा लोकांच्या मनावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या गावात मुलगी देण्यास अन्य गावांतील कोणत्याही मुलीचे आई-वडील सहजासहजी तयार होत नाहीत.

ऑल्वीन्हो गोम्स यांच्या 'व्हिलेज गोवा' या पुस्तकातही कदंबा साम्राज्यातील राणीने दिलेल्या शापाचा उल्लेख आहे, ज्याचा पीढीनिहाय मौखिक प्रसार सुरुच असून लोकांमध्ये आजही त्याची भिती कायम आहे. आजपर्यंत या गावातून अनेक युवक विवाह करुन मडगाव, पणजी येथे स्थायिक झाले आहेत. 

काय आहे इतिहास? 
16 ऑक्‍टोबर 1345 मध्ये मध्यरात्री नवाब जमाल-उद-दीन याने गोवापुरी (सध्याचे गोवा वेल्हा) व चद्रपूर (सध्याचे चंदोर) या दोन्ही ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला होता. त्यात नवविवाहित राजा सिरियादेवा याचा मृत्यू सोबतच कदंबाच्या घराण्यातील सर्व पुरुषांची हत्या करण्यात आली होती.

या हल्ल्यावेळी युवा राजाची पत्नी तिच्या वडिलांच्या हंगल येथील महालात होती. काही दिवसांनी परतल्यावर तिला पतीच्या मृत्यूबद्दल समजले. तसेच राजघराण्यातील सर्व स्त्रीयांनी नदीत उड्या घेऊन जीव दिला होता. दु:खी झालेल्या राणीने राजाच्या समाधीवर जाऊन आपल्या हातातील बांगड्या दगडावर फोडल्या आणि चंद्रपूरच्या महिलांना शाप दिला.

शाप देताना तिने गावात लग्न करुन येणाऱ्या नवविवाहिता विधवा होतील असे म्हटल्याचे जुने जाणकार सांगतात. तेव्हापासून लोकांनी राणीने दिलेल्या शापावर विश्‍वास ठेवून त्याच्या धास्तीने चंदोर गावात लग्न करणे बंद केले.

loading image
go to top