

Rabies Case Girl Dies Six Months After Dog Scratch in Maharashtra
Esakal
नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : भटक्या श्वानाच्या नखामुळे झालेल्या संसर्गामुळे नऊ वर्षांच्या कशिश सहानी हिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण रेबीज असल्याचे स्पष्ट झाले आहे. भटक्या श्वानाचे नख लागून झालेल्या संसर्गाकडे दुर्लक्ष झाल्याने नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सहा महिन्यांनंतर प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.