बनावट कागदपत्र देऊन घ्यायचे दुचाकीसाठी लोन, पोलिसांना लागली टीप आणि असा रचला गेला सापळा

बनावट कागदपत्र देऊन घ्यायचे दुचाकीसाठी लोन, पोलिसांना लागली टीप आणि असा रचला गेला सापळा

मुंबई : दुचाकी वाहनांच्या शोरूममध्ये बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड आणि इतर दस्तावेजाच्या आधारावर विविध संस्थांचे कर्ज घेऊन नंतर त्या गाड्यांवर बनावट नंबरप्लेट लावून कमी किमतीत विकणाऱ्या टोळीला टोळीला मुंबई गुन्हे शाखा युनिट-९ च्या पथकाने जेरबंद केले आहे.

५० बनावट कागदपत्रांच्या आधारे गाड्या विकल्या असल्याची माहिती पोलिस पथकाने मिळवली आहे. याप्रकरणी पोलिस पथकाने दोघं आरोपीना अटक केली आहे. 

मुंबई गुन्हे शाखा युनिट-९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे याना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर कारवाई करण्यात आली. ११ सप्टेंबर रोजी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे बँकाकडून विकत घेतलेली सुझुकी ऍक्सेस गाडी विकण्यासाठी मुंबईमधील माहीम परिसरात येणार असलायची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 

चौकशीत बनावट दस्त साथीदाराच्या संगनमताने तयार करून आधारकार्ड, पॅनकार्ड,आणि दस्त तयार करून आयडीएफसी फर्स्ट बँक, कॅपिटल फर्स्ट बँक, एयॉन क्रेडिट सर्व्हिस प्रायव्हेटर लिमिटेड आदी बँकांकडून ३५ लाखाचे कर्ज घेऊन ५० मोटारसायकली युनायटेड मोटर्स माहीम, अगरवाल मोटर्स, संत्रस्त आणि रत्ना मोटर्स डी बी मार्ग ग्रँडरोड येथील शोरूममधून घेतल्या.

आता बनावट कागदपत्र बनवून लोकांना वाहने विकून गंडा घातल्याप्रकरणी भायखयात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुण आणि नवी मुंबईतील तळोजा येथे राहणाऱ्या अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पथक याबाबत अधिक तपस करीत आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

racket busted by mumbai police who used to buy two wheeler by using fake ID cards 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com