
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) राज्यात स्वबळाची भाषा बोलत असले, तरी देशात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. विरोधी पक्षांची एकजुट करण्यासाठी शरद पवार (sharad pawar) व राहुल गांधी (rahul gandhi) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळात राहुल गांधी मातोश्रीला भेट देणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा वेळी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या भाषेचे काय होईल, असा सवाल राज्याचे अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केला आहे. ‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. (rahul gandhi comes Matoshri what about Patole)
विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे, हे शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पवार विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी काम करणार आहेत; मात्र त्याचे नेतृत्वही तेच करतील, अशी शरद पवारांची भूमिका नसल्याचे मलिक म्हणाले. मुंबईत लवकरच निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुंबईत मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी मनसे-भाजपची छुपी युती होण्याची शक्यता मलिक यांनी वर्तवली. मराठी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन करून फायदा मिळवणे, हाच भाजपचा अजेंडा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांचे शत्रू नाहीत. कोरोना परिस्थिती बघून मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करतील, तसेच दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली स्थिती पाहून ते जनतेच्या हिताचा निर्णय घेतील.
- नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.