Dombivali News : राहुल गांधींचा निषेध करत भाजप कार्यकर्ते आक्रमक

संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करुन त्यांचा अवमान केला.
Rahul Gandhi Protest
Rahul Gandhi ProtestSakal

डोंबिवली - संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करुन त्यांचा अवमान केला. याचा कल्याण डोंबिवली भाजपच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सांविधानिक पदावरील व्यक्तींचा अपमान करणाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे देशाचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करुन त्यांचा अवमान केला. त्यावेळी काँगेसचे खासदार राहुल गांधी हे त्याचे चित्रण करीत होते. ही बाब संविधानाला गुंडाळून ठेवण्यासारखी आहे. याचा कल्याण डोंबिवली भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

डोंबिवलीतील घरडा सर्कल येथे एकत्र येत भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे, नंदू परब, विषु पेडणेकर, मनीषा राणे यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार पदावर असणाऱ्या एखाद्या लोकप्रतिनिधीने सांविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबाबत असे वर्तन करणे हे लोकशाहीचा आणि समस्त भारतीयांचा अपमान करण्यासारखे आहे. याबाबत कडक कायदे करून सांविधानिक पदावरील व्यक्तीचा अपमान करणाऱ्यास निलंबित केले जावे अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com