

Rahul Narwekar controversy explanation
esakal
Speaker Rahul Narwekar news : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथील शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. नार्वेकर शुक्रवारी (ता. १३) खासगी जमिनीची मोजणी करण्यासाठी आले असता, काही शेतकरी त्यांना जाब विचारत हुसकावत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, नार्वेकर यांनी या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.