खजुराच्या नावाखाली सुरु होता गोरखधंदा, यावेळी माल आलेला दुबईवरून, पण...

खजुराच्या नावाखाली सुरु होता गोरखधंदा, यावेळी माल आलेला दुबईवरून, पण...

मुंबई : खजूरच्या बॉक्समध्ये लपवून परदेशी सिगरेटची तस्करी करणाऱ्या टोळीचा  पर्दाफाश करण्यात महसुल गुप्तवार्ता संचलनालयाला म्हणजेच DRI ला यश आले आहे. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून न्हावाशिवा बंदरावरून साडे अकरा कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊननंतर परदेशी सिगरेटची मागणी प्रचंड वाढल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.

एकतीस वर्षीय मनिष शर्मा आणि एकोणतीस वर्षीय सुनील वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते दोघेही मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहेत. न्हावाशिवा बंदरावर आलेल्या एका कंटेनरमध्ये परदेशी सिगारेट्स लवपून आणण्यात आल्याची माहिती डीआरआयच्या अधिका-यांना मिळाली होती. त्यानुसार शोध घेतला असता या कंटेनरमध्ये 600 मास्टर बॉक्समध्ये 32 हजार 640 सिगरेट बॉक्स होते. बॉक्समधून गुडांग गरम, डनहिल स्विच, हड्ज या सारख्या परदेशी सिगरेटची तस्करी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान तपासणीत 71 लाख 61 हजार 600 परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या असून त्याची किंमत 11 कोटी 38 लाख रुपये आहे. या प्रकरणातील अटक आरोपी मनीष शर्मा हा वाघमारेकडून वीजेचे बिल, पॅनकार्ड अशी कागदपत्रे घेऊन त्याच्या सहाय्याने बनावट कंपन्यांसाठी जीएसटी व आयात निर्यात क्रमांक मिळवून द्यायचा. याशिवाय बनावट कागदपत्रांच्या सह्यायाने तस्करीचा माल भारतात आणायचा. त्यात वाघमारे शर्माला मदत करत होता. त्यामुळे या तस्करीप्रकरणी डीआरआयने या आरोपींना अटक केली.

या संपूर्ण प्रकरणामागे मोठं रॅकेट असून दुबईवरून हा माल खजूराच्या नावाखाली मुंबईत आणला गेला होता. लॉकडाऊनच्या काळात सिगरेटची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे या सिगरेट चढ्या भावाने विकून मोठा फायदा कमवण्याचा या टोळीने कट रचला होता. पण त्यापूर्वीच त्यांना पकडण्यात आले. लॉकडाऊननंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी सिगरेट पकडण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले.

raid by directorate of revenue Intelligence important cigarettes worth 11.50 crore seized

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com