
-सुनील पाटकर
जंक फूड, फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे आहारातील कडधान्ये व डाळींचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम लहान मुले व नव्या पिढीच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. लाेकांना कडधान्ये व डाळींचे महत्त्व कळावे, याकरिता १० फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिवस साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यात काही वर्षांत कडधान्य लागवडीखालील क्षेत्र वाढले असून यासाठी कृषी विभागाकडून विशेष उपक्रम राबवण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.