esakal | रायगड जिल्ह्यातील नऊ घरफोड्या उघड 
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबाग

जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये रायगड पोलिसांना यश आले आहे. आणखी गुन्हेगारांना ताब्यात घेतल्यावर अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 
- अनिल पारसकर, पोलिस अधीक्षक, रायगड 

रायगड जिल्ह्यातील नऊ घरफोड्या उघड 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग (बातमीदार) ः माणगाव, महाड या दक्षिण रायगडमधील भागामध्ये घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नऊ घरफोड्या उघडकीस आणल्या. दोघे जण ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सात लाख 11 हजार 729 किमतीचे 26 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आणखी काही चोरट्यांना पकडण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये पथक पाठविण्यात आले आहेत. 
दक्षिण रायगडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला होता. मध्य प्रदेशमधून बसने येऊन ही टोळी जंगलात राहत असे. दिवसभरात चोरी करण्याच्या ठिकाणी पाहणी करीत असे. मध्यरात्रीनंतर 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने लंपास करीत असत. घरफोडी केल्यावर त्या ठिकाणी एक दगड ठेवून चोरटे पसार होत होते. महाड शहर, रोहा, माणगाव या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांकडून हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला. पोलिस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. खबऱ्यांद्वारे माहिती मिळवून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणी पथक पाठवून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी पोलिसांचीही मदत घेण्यात आली. अखेर सुनील लालसिंग मुझालदा (वय 23, रा. घोर, पो. टांडा, ता. कुक्षी, जि. धार) व रवी ऊर्फ छोटू मोहन डावर (18, रा. जवार टेकडी, ता. जि. इंदोर) या दोघांना मध्य प्रदेशमधून अटक केली. पोलिसी दणक्‍याने त्यांना बोलते करण्यात आले. रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, पुणे व अहमदनगर येथेही घरफोडी केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्याकडून एकूण 21 मालमत्तांचे गुन्हे उघडकीस आले होते. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील नऊ घरफोडीचे गुन्हे उघडकीस झाले. माणगावमधील दोन, महाड शहरामधील दोन, रोह्यामधील दोन, कोलाडमधील दोन, नागोठण्यातील एक अशा एकूण नऊ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. या आरोपींकडून सात लाख 11 हजार 729 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या गुन्ह्यात आणखी काही चोरट्यांचा समावेश असून, त्यांच्याकडूनही आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये रायगड पोलिसांना यश आले आहे. आणखी गुन्हेगारांना ताब्यात घेतल्यावर अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 
- अनिल पारसकर, पोलिस अधीक्षक, रायगड 

loading image
go to top