माणगावात महाविकासआघाडीचा पॅटर्न यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

माणगाव : माणगाव तालुक्‍यातील निजामपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाशिवआघाडीच्या वासंती संतोष वाघमारे बिनविरोध निवडून आल्या. याआधी द्रौपदी पवार या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. परंतु 29 एप्रिल 2019 रोजी त्यांचे सर्पदंशाने निधन झाले. त्यामुळे ती जागा रिक्त झाली. या जागेसाठी बुधवारी पोटनिवडणूक झाली. 

या पोटनिवडणुकीत मदीना बळीराम कोळी, गौरी तुकाराम मोरे, वासंती संतोष वाघमारे, हिराबाई दत्ताराम वाघमारे, माधुरी मनोहर साबळे यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, सर्वांच्याच यशस्वी मध्यस्थीने बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात आली. 

या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, सुधाकर पवार, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, संजय घाग, गणेश समेळ, मिलिंद फोंडके, किरण पागार, माजी उपसभापती तुकाराम सुतार, रमेश दबडे, सुरेंद्र पालांडे, शिवा घाग यांच्यासह महाशिवआघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue