पेणकरांना मुबलक पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पेण: पेण तालुक्‍यातील रखडलेल्या वाशी, शिर्की खारेपाट पाणीपुरवठा योजनेची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. १८ किलोमीटर लांबीच्या या योजनेपैकी १५ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून तीन किलोमीटर लांबीचे काम अपूर्ण आहे. या पाणीपुरवठा योजनेचा लाभ काम पूर्ण होताच पेणकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. 

पेण: पेण तालुक्‍यातील रखडलेल्या वाशी, शिर्की खारेपाट पाणीपुरवठा योजनेची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. १८ किलोमीटर लांबीच्या या योजनेपैकी १५ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून तीन किलोमीटर लांबीचे काम अपूर्ण आहे. या पाणीपुरवठा योजनेचा लाभ काम पूर्ण होताच पेणकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. 

पेण तालुक्‍यातील रखडलेल्या वाशी, शिर्की खारेपाट पाणीपुरवठा योजनेची सोमवारी आमदार रवींद्र पाटील यांनी पाहणी करून या योजनेचा आढावा घेतला. या वेळी युवा नेते वैकुंठ पाटील, ललित पाटील, वढावच्या सरपंच पूजा पाटील, उपसरपंच ओमकार पाटील, बोरझेचे सरपंच मिलिंद पाटील, खारेपाट पंचक्रोशी चळवळीचे गणेश पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अभियंता पांडुरंग डोईफोडे आदींसह खारेपाट विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.

पेण तालुक्‍यातील खारेपाट विभागातील वाशी, वाढाव, कणे, बोरझे, भाल, विठ्ठलवाडी, तुकाराम वाडी, काळेश्री, शिर्की, बोरी, बेणेघाट आदी २७ गावे व वाड्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी हेटवणे धरण ते शहापाडा धरण व शहापाडा धरण ते वाशी, शिर्की खारेपाट विभाग अशा १८ किलोमीटर लांबीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून ३८ कोटी रुपयांचा निधी दिला होता.

या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात होऊनदेखील हे काम पूर्ण होऊ शकले नाही. १८ किलोमीटर लांबीच्या या योजनेपैकी १५ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून तीन किलोमीटर लांबीचे काम अपूर्ण आहे. या रखडलेल्या कामाबाबत सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता पांडुरंग डोईफोडे, कंत्राटदार यांच्यासह हेटवणे धरण ते बोरगावपर्यंत पाहणी करण्यात आली.

पंप हाऊसचे काम पूर्ण करण्याचे आदेश
हेटवणे येथे उभारण्यात येणारे पंप हाऊसचे काम अर्धवट असल्याने हे काम जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आमदार रवींद्र पाटील यांनी दिले. आधारणे गावातील शेतकरी देविदास नाईक यांना २०१२ पासून संपादित जागेचे भूभाडे न मिळाल्याने त्यांनी याबाबत न्यायालयात दावा दाखल केला आहे. संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ भूभाडे देण्याचे आदेशदेखील या वेळी दिले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue