पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यांची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

कर्जत : कर्जत तालुक्‍यातील खांडस हा अतिदुर्गम भाग असून पावसाळा संपून एक-दोन महिने उलटताच या परिसरात पाणीटंचाईची समस्या जाणवते. या पाणीटंचाईवर अद्याप प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खांडस ग्रामपंचायतीचे सरपंच मंगल ऐनकर यांनी उन्हाळ्यापर्यंत पाण्याचा साठा टिकून राहावा, याकरिता येथून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविण्यासाठी ओढ्यांवर श्रमदानातून मातीच्या बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. 

कर्जत तालुक्‍यातील खांडस हा भाग भीमाशंकर डोंगराच्या पायथ्याशी आहे. खांडस हे तालुक्‍याचे टोक आहे. खांडस ग्रामपंचायत हद्दीत अनेक छोट्या, मोठ्या आदिवासी वाड्या, पाडे आहेत. मात्र, पाण्याचा पर्याय येथे नाही. अनेक ठिकाणी पावसाळ्यानंतर येथे पाणीटंचाईच्या झळादेखील बसायला सुरवात होते. येथील महिला, मुली यांची पाण्यासाठीची पायपीट ही डोळ्यात पाणी आणणारी ठरते. त्यामुळे येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खांडस ग्रामपंचायतीचे सरपंच मंगल ऐनकर यांनी पुढाकार घेतला आहे.

गावाच्या शेजारून जाणाऱ्या ओढ्यांवर श्रमदानातून माती बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. 
यंदा पाऊस उशिरापर्यंत होता. त्यामुळे ओढश, नदी, नाले यांना अजूनही पाणी आहे. याचा विचार करत ऐनकर यांनी ग्रामविकास अधिकारी महेंद्र कुंटे, ग्रामपंचायत कर्मचारी कैलास ऐनकर, नीलेश डुकरे, अशोक ऐनकर, रोहिदास मेंगाल, ग्रामस्थ निवृत्ती ऐनकर, शिवनाथ ऐनकर, पांडू ऐनकर यांसह ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून वनराई बंधारे बांधले. तसेच चाफेवाडी परिसरातील ग्रामस्थांना व चाफेवाडी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्या भागातही जल संकटावर मात करण्यासाठी सरसावले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue