रेवतळे पूल अधांतरी 

पुलाचा प्रश्‍न
पुलाचा प्रश्‍न

महाडः महाड-लाटवण मार्गे दापोली व मंडणगड मार्गावरील रेवतळे गावाजवळ असलेला नागेश्‍वरी नदीवरील पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या जोड रस्त्याकरिता लागणारी शेतकऱ्यांची जमीन संपादित न केल्याने शेतकऱ्यांनी हरकत घेतल्यामुळे हे काम थांबले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले असून, लवकरच याबाबत तोडगा निघण्याची शक्‍यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे.
 
तालुक्‍यातील रेवतळे गावाजवळ महाड-लाटवण मार्गे दापोली तसेच महाड-लाटवण मार्गे मंडणगड मार्गावर एक जुना पूल आहे; मात्र हा पूल कमी उंचीचा आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात पुलावरून पाणी जाते. शिवाय जवळच बांधण्यात येत असलेल्या नागेश्‍वरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात हा पूल जात असल्याने या ठिकाणी नव्याने पूल बांधण्याची गरज निर्माण झाली. त्यानुसार 2015 मध्ये या पुलाचे काम मंजूर झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधल्या जाणाऱ्या पुलासाठी 3 कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले. काम सुरू होण्यापूर्वी पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूकडील रस्त्याला लागणाऱ्या जमिनीचे संपादन केले नव्हते.

भूसंपादन कायद्याप्रमाणे किमान तीन एकरच्या पुढील जमिनी संपादित करावयाच्या असतील तरच सरकरी नियमानुसार संपादन करता येते; मात्र या ठिकाणी कमी क्षेत्र संपादन असल्याने हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पुलाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण होत आले असतानाच या कामाला स्थानिकांनी हरकत घेतली आहे. पुलाजवळील जोड रस्त्याची जमीन संपादित केली नाही, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी केल्याने हे काम थांबवण्यात आले. येथील शेतकऱ्यांनी भूसंपादन व्हावे मगच पूल पूर्ण करावा, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून हे काम रखडले आहे. पूल अपूर्णावस्थेत असल्याने शेतकऱ्यांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. याबाबत गेली दोन वर्षे स्थानिक प्रशासनही पाठपुरावा करत आहे. सध्या हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने कामाचा धोका स्थानिकांना होत आहे. 

रेवतळे येथील पुलाचा प्रश्‍न गेली काही वर्षे प्रलंबित आहे. एक तर जागेचा प्रश्‍न सोडवावा किंवा पुलाचे काम पूर्ण केले जावे. प्रशासनाने पुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे. 
- किशोर शेठ, ग्रामस्थ 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. येत्या काही दिवसांत याबाबत बैठकही होणार आहे. लवकरच याबाबत निर्णय होऊन पुलाचे काम मार्गी लावले जाईल. 
- एस. व्ही. पठाडे, उपविभागीय अभियंता, महाड सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com