कडाक्याच्या थंडीत गेला तोल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मित्रांसोबत पार्टी करत असताना घडले अघटीत

मुंबई : सध्या मुंबईकर थंडीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. मात्र अशातच मुंबईपासून काही अतंरावर असणाऱ्या हाजीमलंग गडावर मात्र कडाक्याच्या थंडीमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा - 16 वर्षांपासून मोबाईल वाट पाहताहेत मालकाची...

मनोज मखिजा असे या तरुणाचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी हाजीमलंग गडावर गेला होता. मनोज हा पेशाने रिक्षाचालक असून तो उल्हासनगरमधील कॅम्प न.2 येथील खेमानी परिसरात वास्तव्यास होता. दरम्यान मनोज पार्टी करण्यासाठी म्हणून हाजीमलंग गडावर गेला होता.

हेही वाचा - बसच्या अपघातात वीस विद्यार्थी जखमी

मध्यरात्रीपर्यंत त्यांची पार्टी चांगली रंगली. मात्र त्यानंतर कडाक्याच्या थंडीमुळे पुन्हा गडावरुन उतरने सर्वांनाच अवघड पडत होते. अशातच वाटेत एक दगड आल्याने मनोजचा तोल गेला आणि तो थेट बाजूला असणाऱ्या दरीत कोसळला. ती दरी जवळपास 30 फूट खोल असल्याने मनोजचा मृत्यू झाला असून याबाबत  हिललाईन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान संबधित प्रकरणाचा हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरेश चव्हाण तपास करीत आहेत. 

web title : a young guy died due to falling in valley


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a young guy died due to falling in valley