esakal | खालापुरात चार फुटी मांडूळ
sakal

बोलून बातमी शोधा

 मांडूळ

सर्पमित्र दिनेश ओसवाल यांना नवीन मोरे, अमोल ठकेकर, धर्मेंद्र रावळ, राजेश अभानी, चेतन चौधरी, गुरुनाथ साठेलकर, हनिफ कर्जीकर, भूपेंद्र पन्नलाल, मुनाफ शेख, आनंद दोडमनी यांनी खालापूरचे वनक्षेत्रपाल आशीष पाटील यांना संपर्क केला. पकडलेला मांडूळ वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून सुरक्षित स्थळी गुप्तता बाळगत सोडण्यात आला

खालापुरात चार फुटी मांडूळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खालापूरः तस्करांच्या रडारवर असलेला मांडूळ जातीचा साप खालापुरातील शीळ फाटा येथील मिळ गावाच्या वस्तीत झोयेब सय्यद यांच्या घराजवळ सापडला. सर्पमित्र दिनेश ओसवाल यांनी चार फुटी मांडूळ सापाला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.
 
गुप्तधनासाठी मांडूळ सापाची अंधश्रद्धेतून मोठ्या प्रमाणात तस्करी होते. लाखो तर कधी कोट्यवधीची किंमत मांडूळ सापाला भेटते; परंतु गुरुवारी हा साप आढळल्यानंतर सर्पमित्र दिनेश ओसवाल यांना नवीन मोरे, अमोल ठकेकर, धर्मेंद्र रावळ, राजेश अभानी, चेतन चौधरी, गुरुनाथ साठेलकर, हनिफ कर्जीकर, भूपेंद्र पन्नलाल, मुनाफ शेख, आनंद दोडमनी यांनी खालापूरचे वनक्षेत्रपाल आशीष पाटील यांना संपर्क केला. पकडलेला मांडूळ वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून सुरक्षित स्थळी गुप्तता बाळगत सोडण्यात आला. 

मांडूळ जातीचा साप निरुपद्रवी असतो. दोन तोंड असल्यामुळे गैरसमज असतात. मातीत पडून राहणारा मांडूळ तस्करीमुळे नामशेष होत चालला आहे. सर्पमित्रांच्या विशेष आभार वन विभागाला वेळेत माहिती दिली. 
- आशीष पाटील, मुख्य वनक्षेत्रपाल, खालापूर 

loading image