लोधीवलीत घर कोसळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

अचानक आवाज येऊ लागल्याने घरातील चारही सदस्य धावत बाहेर आले आणि क्षणार्धात घर कोसळले.

मुंबई- खालापूर तालुक्‍यातील लोधीवली आदिवासीवाडीत राहणाऱ्या ताई हिरामण वाघमारे यांचे राहते घर रविवारी (ता. 22) सायंकाळी 4.30च्या सुमारास अचानक कोसळले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी वाघमारे यांचे नुकसान झाले.

आम्हीही माणसे आहोत....

अचानक आवाज येऊ लागल्याने घरातील चारही सदस्य धावत बाहेर आले आणि क्षणार्धात घर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच तहसील आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, ग्रामस्थ मदतीसाठी धावले. पडलेल्या घराच्या ढिगाऱ्यात वाघमारे कुटुंबाचा संसार गाडला गेल्याने अनेक मदतीचे हात पुढे आले असून, सरकारने तातडीची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाघमारे कुटुंबाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना तत्काळ आदेश देण्यात आले आहेत. तातडीची मदत देण्यात येईल, असे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-khalapur Lodhiwali house collapses

टॉपिकस
Topic Tags: