आम्हीही माणसं आहोत... असं का म्हणतायेत एअर इंडियाचे कर्मचारी, वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना एअर इंडियाच्या विमानाने मायदेशी आणले जात आहे; मात्र ही सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या शेजाऱ्यांकडून हेटाळणी केली जात असल्याची तक्रार एअर इंडियाने केली आहे. 

नवी दिल्ली : कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना एअर इंडियाच्या विमानाने मायदेशी आणले जात आहे; मात्र ही सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या शेजाऱ्यांकडून हेटाळणी केली जात असल्याची तक्रार एअर इंडियाने केली आहे. 

एक भीतीदायक अनुभव! ...अन्‌ 27 वर्षांनी मुंबईत सायरन वाजले! 

एअर इंडियाचे कर्मचारी परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन आले असून त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती शेजाऱ्यांनी व्यक्त केली. त्या पार्श्‍वभूमीवर काही जण पोलिसांकडे तक्रार करत आहेत, असे एअर इंडियाने पत्रकात म्हटले आहे. 

रिक्षा, फेरीवाल्यांना बसलाय कोट्यवधींचा फटका!

आमचे कर्मचारी आपल्याच देशवासीयांपैकी कुणाच्या तरी मुला-मुलींना, पतीला, पत्नीला, भावाला, बहिणीला मायदेशात आणण्याचे काम करत आहेत. त्याचा आपल्याच नागरिकांना विसर पडत आहे. खरं तर आमचे कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एकप्रकारे मदतच करीत आहेत. त्यांचाही सर्वांनी सन्मान करायला हवा, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. कोरोनाचा फैलाव झालेल्या देशातून भारतीय लोकांना आणण्यासाठी पुरेशी काळजी घेतली जात आहे, असेही एअर इंडियाने म्हटले आहे. 
---- 
आम्हीही माणूस आहोत 
आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही. तो पगार मिळेल की नाही याचीही खात्री नसते; मात्र आणीबाणीच्या ठिकाणी काम करण्यास बोलावल्यावर आम्ही त्याचा विचार करीत नाही. आम्हीही शेवटी माणूसच आहोत, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. 

 

Air India employees Deportation from neighbors


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India employees Deportation from neighbors