रायगडमध्ये पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले, धक्कादायक आकडेवारी समोर

रायगडमध्ये पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले, धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई: रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात सुमारे एक हजार 43 जणांनी आत्महत्या केली आहे.  त्यात 29 वर्षावरील पुरुष 537, महिला 183 तसेच 18 वर्षावरील युवक 208 तर115 युवतींचा समावेश आहे. यामध्ये महिलांच्या तुलनेने पुरुषांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. आत्महत्येचे कारण वेगवेगळे असले तरीही नैराश्य हे प्रमुख कारण आहे. मात्र समुपदेशाने त्यावर मात करणे शक्य होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
 
कौटुंबिक कलह, पत्नीचा एकाधिकारशाहीपणा, कमी वेतनातून घर खर्च चालविणे, आजारपण, कर्जबाजारीपणा वाढती बेरोजगारी, नापास होण्याची भीती, नापास झाल्याने, टक्के कमी पडल्याने, प्रेमप्रकरण, अशा वेगवेगळ्या कारणामुळे तणाव निर्माण होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढू लागले आहे.

2016 मध्ये 35 महिलांनी तर 128 पुरुषांनी आत्महत्या केल्या होत्या. यामध्ये 18 वर्षावरील 38 युवक, 15 युवती तसेच 29 वर्षापुढील 21 महिला आणि 90 पुरुषांचा समावेश आहे. तसेच 2020 मध्ये  54 महिला तर 145 पुरुषांनी आत्महत्या केल्या. त्यात 29 वर्षावरील 39 महिला, 105 पुरुष तसेच18 वर्षावरील 15 युवती 40 युवकांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. 

या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात महिला, पुरुष, युवक युवती यांच्या आकडेवारीत वाढ असली तरी 29 वर्षावरील महिला आणि 18 वर्षावरील युवतींच्या तुलनेत पुरुष आणि युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण दुपट्टीने वाढले असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये काही जण गळफास घेऊन, विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करीत असतात. 

आत्महत्येवर दृष्टीक्षेप 

वर्षे महिला पुरुष युवक युवती
         
2016 21 90 38 15
2017 39 99 37 26
2018 36 126 55 32
2019 48 117 38 27
2020 39 105 40 15


 आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन केंद्राचा आधार
 
आत्महत्या रोखण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात समुपदेशन केंद्र केले आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडून मानसिक रुग्णांना मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते. वेगवेगळ्या पध्दतीने समुपदेशन करून नागरिकांशी चर्चा केली जाते. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य पध्दतीने उपाय करण्यासाठी अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेश केंद्र आधार बनू लागला आहे. दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. यानिमित्त आत्महत्या करणार नाही, याची प्रतिज्ञा घेतली जाते.

हेही वाचामुंबईतून थंडी गुल, तापमानात अधिक वाढ

वाढत्या स्पर्धेमुळे एकमेकांना कमी लेखण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात
व्यसनाधीनताही वाढल्याने रागाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणीही माझ्या मदतीला नाही. मी काहीही करु शकत नाही या मानसिकेतेमुळे अनेक आत्महत्या करतात. यावर जीवन संपविणे हा उपाय नसून संबंधित मित्र, घरातील मंडळी अथवा मानसोपचार तज्ञांशी मनमोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. 
डॉ. अमोल भुसारे, मानोपचार तज्ज्ञ

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Raigad from Last five year increase male took extreme Step

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com