श्रीसदस्यांच्या श्रमदानाने जिल्हा गजबजला

नानासाहेब धर्माधिकारी
नानासाहेब धर्माधिकारी

अलिबागः सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यात आज जनजागृती स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानमार्फत सर्व सरकारी कार्यालये, अंतर्गत रस्ते, अलिबाग शहर, समुद्रकिनारा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी 28.450 टन कचरा गोळा करण्यात आला. अभियानामध्ये 2102 सदस्य उपस्थित होते. अभियान यशस्वी करण्यासाठी पिकअप, टेम्पो व ट्रॅक्‍टर अशी 40 वाहने वापरण्यात आली.

एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही
 
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडामार्फत सातत्याने सामाजोपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, जनजागृती शिबिर, पाणपोई, आपद्‌ग्रस्तांना मदत यांसारखे अनेक उपक्रम राबविले जातात. गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठानमार्फत देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दखल घेत त्यांनी ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली.
 
देशभरातील सर्वच स्तरांतील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत आपापले योगदान दिले. त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानाला योग्य दिशा मिळाली आणि स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले. 3 मार्चला निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेर जनजागृती स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी 7.30 वाजता जयवंत गायकवाड, रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग व्यवस्थापक यांनी सरकारच्या वतीने शुभेच्छा देऊन उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व सरकारी कार्यालये, अलिबाग शहर, अंतर्गत रस्ते समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली. या वेळी 2102 श्रीसदस्यांनी स्वच्छता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com