Ganesh Festival : रेवदंड्यात आजही नाचत्‍या गौरींची परंपरा,दीडशे वर्षांपूर्वी सुरुवात; महिलांची लगबग

घरात आल्यावर कुठून आलीस, अशी विचारपूसही केली जाते.
raigad
raigadsakal
Updated on

रेवदंडा - कोकणाच्या संस्‍कृतीत गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दीड दिवसांपासून ते दहा दिवसांपर्यंत सुरू असणाऱ्या या आनंदी सोहळ्यासाठी चाकरमानी गावात दाखल झाली आहेत. गणरायाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी ज्‍येष्‍ठा गौरीचे आवाहन आहे. गुरुवारी (ता. २१) होणाऱ्या माहेरवाशीण गौरीच्या आगमनाची महिलावर्गाकडून तयारी सुरू आहे. यात काही उभ्‍या गौरी बसवतात, तर काही एका गौरीचे पूजन करतात. काही तेरड्याची तर काही खड्यांच्या गौरीची पूजा करतात. रेवदंड्यात नाचत्या गौरीची परंपरा आजही कायम आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

गौरी पूजनाची परंपरा वेगवेगळी असली तरी भक्‍तांकडून श्रद्धेत तिळमात्रही कसून नसते. गौरी घरी आल्यावर उंबरठ्यावर तिचे पाय धुवून हळद-कुंकू-अक्षता लावून घरात आणले जाते. घराचा कानाकोपऱ्यात तिला दाखवली जाते. काहींच्या घरात कुमारिकांच्या हातून गौर आणली जाते.

काहींकडे घरातील गृहिणी आणते. घरात आल्यावर कुठून आलीस, अशी विचारपूसही केली जाते. तीन दिवस गौरीचा पाहुणचार केला जातो. पहिला दिवस आगमनाचा, दुसरा गौरीपूजनाचा आणि तिसऱ्या दिवशी जडअंतकरणाने निरोप देत विसर्जन केले जाते. रेवदंड्यात सुमारे दिडशे वर्षांपूर्वी नाचत्या गौरी सुरू करण्याचे श्रेय राघो महादेव जोशी यांना जाते.

raigad
Nagpur News : महिला आरक्षण घराणेशाहीतील महिलांसाठी नको; नागपूरकर महिलांच्या भावना
raigad
Pune News : भाटघर धरण १०० टक्के भरले

गौरी पूजनाच्या दिवशी हळदी-कुंकू आयोजित केले जाते. कोकणात गौर जागवण्याचा कार्यक्रम असतो. रात्री गाणी-नाच, फुगड्या, सोंगट्या असे खेळ खेळले जातात. गौर म्हणजे पार्वतीचे रूप. रेवदंडामध्ये गडमुळे, मोरे, कुंभार व जोशी यांच्या साजशृंगार केलेल्‍या गौर वाजत-गाजत पारनाका येथे महिलांकडून नाचवल्या जातात. ते पाहण्यासाठी अलोट गर्दी जमते.

raigad
Vitamin H च्या कमतरतेमुळे शरीरात उरणार नाही एनर्जी, ही लक्षण दिसताच घ्या योग्य आहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com