पोलादपुरात कुत्र्यांना त्वचारोग 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

त्वचारोगामुळे कुत्र्यांच्या अंगावरील सर्व केस गळून जाऊन त्यांना प्रचंड खाज सुटत असल्याने अंगावर ठिकठिकाणी गंभीर जखमा आहेत. अनेक कुत्री गंभीर स्वरूपात असून, त्यांना दुर्गंधी येत आहे.

पोलादपूर: शहरात 250 कुत्र्यांचे नगरपंचायतीने काही महिन्यांपूर्वी निर्बीजीकरण केले होते. या मोहिमेमुळे कुत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आली होती; मात्र मागील काही दिवसांपासून कुत्र्यांना त्वचारोग झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे.

तळोजा येथे बसला अपघात

 
त्वचारोगामुळे कुत्र्यांच्या अंगावरील सर्व केस गळून जाऊन त्यांना प्रचंड खाज सुटत असल्याने अंगावर ठिकठिकाणी गंभीर जखमा आहेत. अनेक कुत्री गंभीर स्वरूपात असून, त्यांना दुर्गंधी येत आहे. याबाबत पोलादपूर मनसेच्या वतीने नगरपंचायतीने अशा कुत्र्यांवर योग्य उपाययोजना करण्याचे निवेदन दिले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलादपुरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपंचायतीने ताबडतोब कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

भटक्‍या कुत्र्यांमध्ये "स्कीन इन्फेक्‍शन' आहे. याला सायंटिफिक भाषेत Mange असेही म्हणतात. कुत्री एकत्र असताना किंवा एकत्र ठेवताना हे इन्फेक्‍शन पसरल्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी अशा कुत्र्यांना हाताळताना किंवा संपर्कात जाताना काळजी घ्यावी. 
- डॉ. मिलिंद जाधव, पशुधन विकास अधिकारी 

काही महिन्यांपूर्वी नगरपंचायतीकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले होते. त्यामुळे या प्रक्रियेतून काही संसर्ग झाला आहे का, हे नगरपंचायतीने पाहून त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. 
- दर्पण दरेकर, मनसे, शहराध्यक्ष 

कुत्र्यांना त्वचारोग झाल्याचे अनेक ठिकाणी आढळून येत आहे. नागरिकांना उद्‌भवणारा धोका लक्षात घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नगरपंचायत तातडीने योग्य उपाययोजना करेल. 
- नागेश पवार, नगराध्यक्ष, पोलादपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-poladpur-dog-problem

टॉपिकस