तळोजा येथे बसला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

नवीन पनवेल : जुईनगर येथे बसचे चाक निखळल्याची घटना ताजी असतानाच तळोजा औद्योगिक वसाहतीनजीक तळोजा-अंबरनाथ रस्त्यावर सोमवारी सकाळी आठ वाजता एनएमएमटी बसचे पुढील चाक तुटून अपघात झाला. घटनेवेळी प्रसंगावधान राखून चालक प्रवीण मोरे यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. 

नवीन पनवेल : जुईनगर येथे बसचे चाक निखळल्याची घटना ताजी असतानाच तळोजा औद्योगिक वसाहतीनजीक तळोजा-अंबरनाथ रस्त्यावर सोमवारी सकाळी आठ वाजता एनएमएमटी बसचे पुढील चाक तुटून अपघात झाला. घटनेवेळी प्रसंगावधान राखून चालक प्रवीण मोरे यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.

महत्‍वाची बातमी : मेट्रोच्‍या कामाचा राडारोडा नाल्‍यात 

कल्याण-बेलापूर मार्गावर तळोजा एमआयडीसीमार्गे जाणारी एनएमएमटीची बस कल्याण स्टेशनहून बेलापूर येथे येत होती. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तळोजा औद्योगिक वसाहतीनजीक बाळेगाव कॅम्प फाटा येथे बस आली. त्यावेळी बसचे पुढील चाक तुटून पडल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा : ठाण्‍यातील पार्किग प्‍लाझामुळे मध्‍य रेल्‍वे कोट्यधीश 

या ठिकाणी तळोजा-अंबरनाथ रस्त्याचे क्रॉंकीटकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे नाहीत. रस्ता अनेक ठिकाणी जमिनीपासून पाच ते दहा फूट वरती आहे. रस्त्याला कठडे नसल्याने बस पाच ते दहा फूट खड्ड्यात जाण्याची शक्‍यता होती. या बसमध्ये 25 प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधाने प्राण वाचल्याचे प्रवासी योगेश डोळस यांनी सांगितले. 

बसचालकांमध्ये संताप 
आठ महिन्यांपूर्वी जुईनगर येथेही एनएमएमटी बसला अपघात झाला होता. त्यामुळे परिवहन सेवेच्या अभियांत्रिकी विभागाच्या कामावर संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. घणसोली आगारात या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही. येथील अनेक बस रस्त्यावर धावतात. परंतु, त्यांची अवस्था बिकट असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. सध्या घणसोली आगारातील अनेक बसचे ब्रेक लागत नाहीत. तसेच स्टेअरिंग व्यवस्थित काम करत नसल्याने चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसचालक अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास अडचणी आणून देतात. मात्र, अभियांत्रिकी विभाग काम करत नसल्याने चालकांना नादुरुस्त बस रस्त्यावर घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी विभागाच्या दुर्लक्षामुळे बसचालकांमध्ये संताप आहे. 

कल्याणला जाणाऱ्या बसचे चाक निघाले, ही खरी घटना आहे. या अपघाताची चौकशी करून कार्यवाही केली जाईल. 
- डी.एम.माने, आगार व्यवस्थापक, आसूडगाव. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bus accident in Taloja