"ते' का म्हणतात, मॉर्निंग वॉक नको रे बाबा

मॉर्निंग वॉक नको रे बाबा
मॉर्निंग वॉक नको रे बाबा
Updated on

नागोठणे-नेरळ, ता. 19 (बातमीदार) : संचारबंदीनंतरही अनेक जण बिनधोक "मॉर्निंग वॉक' करतात. अशा नागरिकांविरोधात रायगड पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार रविवारी (ता. 19) पहाटे 33 जणांना ताब्यात घेतले. त्यांना तब्बल चार तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. नेरळ येथेही अशीच कारवाई करून 33 जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे आता नागरिक मॉर्निंग वॉक नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 

हे वाचा : आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले

नागोठण्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांविरोधात पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमआयडीसी रस्त्यावर पाळत ठेवून 33 जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यांना तब्बल चार तास पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. 
अशी कारवाई नेरळ पोलिसांनी केली. 33 जणांना पोलिस ठाण्यात आणले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. त्यामुळे त्यांना समज देऊन सोडण्यात आले. 

सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक टी. एस. सावंजी यांच्या मार्गदर्शनामध्ये ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नऊ महिलांचाही समावेश होता.  

रायगडमध्ये पाच रुग्णांची भर 
श्रीवर्धन तालुक्‍यातील भोस्ते गावात कोरोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील 28 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी त्याची पत्नी आणि तीन मुलांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 49 झाली आहे. 
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्‍यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर उरणमध्ये दोन रुग्ण सापडले होते. आता श्रीवर्धन तालुक्‍यातील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. भोस्ते गावात पाच रुग्ण आहेत; तर पनवेल ग्रामीणमधील विचुंबे गावातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ती व्यक्ती परराज्यांतून आली होती. प्रवासादरम्यान संसर्ग झाला असावा, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. 
रायगड जिल्ह्यात पाच रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 


... 
नेरळ : संचारबंदी झुगारून "मॉर्निंग वॉक' करणाऱ्यांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com