रायगड : प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी सर केला 300 फूट नागफणी कडा

रायगड : प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी सर केला 300 फूट नागफणी कडा
रायगड : प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी सर केला 300 फूट नागफणी कडाsakal

पाली : सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी रविवारी (ता.7) लोणावळा येथील 300 फुटांचा अवघड नागफणी कडा (ड्युक नोज) यशस्वीपणे सर केला आहे. अशी माहिती मंगळवारी (ता.9) प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी दिली. तसेच या मोहिमेतील चित्तथरारक अनुभव देखील सांगितला.

या मोहिमेत हुले यांच्या सोबत पुण्यातील सहकारी इंद्रनील खुरंगळे, नीलराज माने, कृष्णा बचुटे, योगेश उंबरे व रोहित वर्तक सहभागी झाले होते. मॅकमोहन यांनी सकाळला सांगितले की शनिवारी (ता.6) सायंकाळी पालीतून भर पावसात आम्ही लोणावळ्यात ड्युक न्यूज या कड्याजवळ क्लाइंबिंग करण्यास पोहोचलो. तेथे मुसळधार पावसात कॅम्प लावून वस्ती केली.

रायगड : प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी सर केला 300 फूट नागफणी कडा
रोहित कॅप्टन झाला रे! न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची घोषणा

अशा उंचीचे सुळके किंवा मार्ग क्लाइंबिंग करण्यासाठी टीम ची गरज असते. नागफणी कड्यावर उभ्या चढणीचे टप्पे किंवा कडे, सुळके, एक हात किंवा पाय यांनाच आधार घेता येईल अशा लहान भेगा संपूर्ण शरीर सामावून घेणाऱ्या खडकातील विदरे (चिमनीज), आरोहकाचे हातपाय एकाच वेळी दोन्ही डगरींना स्पर्श करू न शकणाऱ्या घळ्या यांसारख्या कठीण गोष्टींवर चढून कडा पार केला. असे हुले म्हणाले

अधिक लोकप्रिय होतेय माणसाच्या विजिगीषू महत्त्वाकांक्षेला आव्हान देणारा एक क्रीडाप्रकार म्हणून गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. खडकारोहण गिर्यारोहणाचे दोन प्रकार आहेत : १) खडकारोहण/प्रस्तरारोहण (रॉक क्लाइंबिंग) व २) हिमारोहण (आइस क्लाइंबिंग). हिमाच्छादित उच्च शिखरावर अगदी वरच्या चढणीत साधारणतः खडकारोहण करण्याचा गिर्यारोहण पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणू आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडा प्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. गिर्यारोहणात दहा पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते मौंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधनसामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा संभव असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com