मृतदेहाची ओळख तीन वर्षांनंतर पटली

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची तीन वर्षांनंतर ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. शुभम अनिलकुमार बन्सल (२५) असे त्याचे नाव आहे. डाव्या हातावरील ‘ओम’ गोंदण आणि हनुवटीवरून त्याची ओळख पटली. शुभम बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली होती. 

मूळचा उत्तर प्रदेशातील सहारणपूरचा रहिवासी असलेला शुभम बन्सल जून २०१५ मध्ये नीरज गोयल या नातेवाइकासोबत रोजगारासाठी घराबाहेर पडला होता. मुंबईत आल्यावर त्याने कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कपडे व्यवसायासाठी ५० हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नीरज आणि शुभम ग्रॅंट रोड परिसरात आले. त्या भागात त्यांची चुकामूक झाली. नीरजने शोध घेतला; मात्र शुभम सापडला नाही. त्यामुळे नीरजने शुभमच्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून तो बेपत्ता झाल्याची माहिती कळवली. 

पोलिस निरीक्षक (तांत्रिक शाखा) राजेंद्र पाल आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक आर. उडानशिव यांनी तपास सुरू केला. पाल यांनी चर्चगेट रेल्वे पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये झालेल्या अपघाती मृत्यूची माहिती घेतली. ग्रॅंट रोड स्थानकाजवळ रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. हा धागा पोलिसांनी पकडून तपास केला. शुभमच्या डाव्या हातावर ‘ओम’ असे गोंदण होते. त्याचा भाऊ दीपक आज मुंबईत आला. मृतदेहाच्या डाव्या हातावरील गोंदण आणि कपड्यांवरून त्याने शुभमची ओळख पटवली.

Web Title: Railway Accident Deathbody Identity